
वेंगुर्ला: तालुक्यातील म्हापण मधील युवकांनी खासदार विनायक राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत युवासेनेत प्रवेश केला. तर यावेळी म्हापण विभागातील युवासेनेच्या विविध पदांवर त्यांची नियुक्ती करून त्यांचा सन्मान करण्यात आला.
युवासेना तालुकाप्रमुख पंकज शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली वयुवासेना उपतालुकाप्रमुख विश्वनाथ म्हापणकर, विभाग प्रमुख स्वप्नील तळवडेकर यांच्या विशेष प्रयत्नातून येथील साईश सुनिल खोत, मंदार सुधाकर चव्हाण, प्रशांत कोनकर, सुशांत विजय खोत, प्रदीप आप्पा खोत, गौरव राजन खोत यांनी युवासेनेत प्रवेश केला. यावेळी खवणे उपशाखा प्रमुख पदी साईश खोत, म्हापण युवासेना शाखाप्रमुख पदी मंदार चव्हाण तर उपशाखा प्रमुख पदी प्रशांत कोनकर यांची नियुक्ती करण्यात आली.
यावेळी लोकसभा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, जिल्हाप्रमुख संजय पडते, विधानसभा संपर्कप्रमुख शैलेश परब, शिवसेना नेते बाळा गावडे, प्रकाश गडेकर, तालुकाप्रमुख यशवंत उर्फ परब, शहरप्रमुख अजित राऊळ, युवासेना तालुकाप्रमुख पंकज शिरसाट, माजी नगरसेवक तुषार सापळे, जयप्रकाश चमणकर, माजी नगरसेविका सुमन निकम यांच्यासाहित पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.