मोती तलावात युवकाचा मृतदेह...!

Edited by: विनायक गांवस
Published on: April 25, 2024 12:51 PM
views 832  views

सावंतवाडी : शहरातील मोती तलावात सालईवाडा परिसरात युवकाचा मृतदेह आढळून आला. महेंद्र मधुकर मोरजकर ( ४०, सालईवाडा, सावंतवाडी) असे त्या युवकाच नाव आहे अशी माहिती पोलिसांनी दिली.राजवाडा लेस्टर गेट समोर तलावात या युवकाचा मृतदेह निदर्शनास आला. पोलीसांना याची माहिती देताच घटनास्थळी ते दाखल झाले‌. नगरपरिषद कर्मचाऱ्यांनी बोटीच्या सहाय्याने त्या युवकाचा मृतदेह बाहेर काढला. त्याच्या टीशर्टवर सालईवाडा असे प्रिंट दिसून आल्यानं व‌ घटनास्थळी उपस्थितांना त्याची ओळख पटली. मोठ्या संख्येने नागरिकांनी यावेळी गर्दी केली होती.