सागरी महामार्गावर दुचाकी अपघातात तरुण जखमी | माजी खासदार निलेश राणे ताफा थांबवत मदतकार्यात सहभागी

Edited by: कृष्णा ढोलम
Published on: July 30, 2023 13:49 PM
views 884  views

मालवण : देऊळवाडा सागरी महामार्ग येथे रविवारी सकाळी दुचाकी अपघात होऊन एक तरुण रस्त्याच्या बाजूला जखमी स्थितीत दिसून आला. कुडाळ मालवण भाजपा विधानसभा प्रमुख माजी खासदार निलेश राणे हे रविवारी सकाळी मालवण येथून कुडाळच्या दिशेने जात असताना त्यांनी तात्काळ ताफा थांबवत मदतकार्यात सहभागी झाले. 

दरम्यान, उपस्थितांनी रुग्णवाहिका चालकास फोन लावला. अवधूत परुळेकर हे रुग्णवाहिका घेऊन तातडीने त्याठिकाणी दाखल झाले. जखमी तरुणास मालवण ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले आहे.