
कणकवली : राकेश रामकृष्ण निशाद (४३, सध्या रा. ओसरगाव कुलकर्णी चाळ, मुळ रा. रत्नागिरी) हा ८ सप्टेंबर रोजी रात्री ८ वा. च्या सुमारास पत्नीशी झालेल्या भांडणाच्या रागातून घरातून बॅग घेऊन निघून गेला. रात्री तो ओसरगाव येथील भगवती बेकरी येथे झोपला होता.
दुसर्या दिवशी सकाळी ६.३० वा. च्या सुमारास त्याच्यासोबत असलेला संतोष निशाद याला घरी जातो असे सांगून निघून तो गेला. मात्र तो घरी पोहोचला नाही. शोध घेऊनही न सापडल्याने तो बेपत्ता झाल्याची खबर अंकीता अनिल कळबट्टे ( रा. ओसरगाव) हीने कणकवली पोलिसात दिली.
बेपत्ता राकेश याच्या हातावर ओम नमःशिवाय असे गोंदलेले आहे. तरी त्याच्याबाबत कोणाला माहिती मिळाल्यास कणकवली पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. या प्रकरणी अधिक तपास पोलिस हवालदार श्री. मिठबावकर करीत आहेत.