
कणकवली : उंदीर मारण्याचे औषध प्राशन केल्यानंतर उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या सतीश कृष्णा सावंत (३२, कुंभवडे - गावठणवाडी) या युवकाचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी रात्री ११.३० वा. सुमारास घडली. सतीश याने उंदीर मारण्याचे औषध का प्राशन केले, याबाबतची माहिती समजू शकलेली नाही.
औषध प्राशन केल्यानंतर सतीश याला सर्वप्रथम कणकवली उपजिल्हा रुग्णालय व तेथून ओरोस जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र जिल्हा रुग्णालयातील तपासणीअंती सतीश याचा मृत्यू झाला होता. याबाबत सतीश याचा भाऊ सुशील कृष्णा सावंत (३४, कुंभवडे गावठणवाडी) यांनेदिलेल्या खबरीनुसार घटनेची कणकवली पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.