
वेंगुर्ले : वेंगुर्ले तालुक्यातील होडावडा कस्तुरबावाडी येथील प्रवीण तुळशीदास होडावडेकर, वय 38 वर्षे या तरुणाने आपल्या राहत्या घराच्या खोलीतील लाकडी बाराला गळफास लावून घेऊन आत्महत्या केली. आत्महत्ये मागचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी वेंगुर्ले पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.
वेंगुर्ले पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारी मध्ये तुळशीदास बाबू होडावडेकर, वय 61 वर्षे यांनी म्हटले आहे की, होडावडा कस्तुरबावाडी येथे आमच्या राहत्या घरी मुलगा प्रवीण होडावडेकर हा सोमवारी रात्री 8.30 वाजण्याच्या सुमारास खोलीत गळफास लावलेल्या स्थितीत आढळून आला.
दरम्यान तत्काळ त्याला खाली काढून उपचारासाठी सावंतवाडी रुग्णालयात हलविले. मात्र तो उपचारापूर्वीच मृत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या प्रकरणी वेंगुर्ले पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणी अधिक तपास पोलीस अंमलदार आर एम चव्हाण करीत आहेत.