तुमचे दुकानच भंगार झाले ; खासदार राऊत, स्वतःच्या राजकीय भविष्याची चिंता करा !

भाजप नेते निलेश राणे यांचा विजय जनतेने निश्चित केला | धोंडी चिंदरकर यांची ठाकरे गट व खासदर विनायक राऊत यांच्यावर सडकून टीका
Edited by: कृष्णा ढोलम
Published on: March 18, 2023 16:35 PM
views 147  views

मालवण : भारतीय जनता पार्टीच्या जीवावर ज्यानी खासदारकीच पाऊल टाकलं, त्या खासदार विनायक राऊत यांनी स्वतःची राजकीय चिंता करावी. भाजप प्रदेश सचिव निलेश राणे यांचा कुडाळ मालवण मतदारसंघातील विजय जनतेने निश्चित केला आहे. असे सांगत भाजप तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांची ठाकरे गट व खासदर विनायक राऊत यांच्यावर सडकून टीका केलीय. 


खासदार विनायक राऊत यांनी एका कार्यक्रमात बोलताना निलेश राणे यांच्यावर टीका करण्याचा प्रयत्न केला. निलेश राणे यांच्या कामाचा धडाका पाहून आपल्यासारख्या अपयशी खासदार यांच्या पायाखालची वाळू सरकली यामुळे काही महिने खासदार पद असणारे राऊत बरळत आहेत. असे चिंदरकर म्हणाले.


निलेश राणेना निवडून देण्यासाठी जनता सज्ज आहे. त्यांनी कुचकामी खासदार पहिला ती त्रस्त जनता तुम्हाला प्रत्येक निवडणुकीत धडा शिकवत आहे, पुढेही शिकविल. उगाच नसलेलं अवसान खासदार विनायक राऊत यांनी आणू नये. आधी निलेशज राणे यांच्या समोर उभ कोणाला करणार ते सांगा? वैभव नाईक यांना संपवण्याचं काम आपण आधीच सुरु केलेलं आहे. ते इथल्या ठाकरे गटातील कार्यकर्त्यांना माहित झालाय त्यामुळे तुम्ही स्वतःची काळजी घ्यावी. 


तुमची पक्षाच्या माध्यमातून सुरू असलेली दुकानदारी भंगारात गेलली. त्यामुळे खासदार राऊत स्वतःची राजकीय काळजी घ्यावी. दुसरीकडे निलेश राणे आमदार होणे ही औपचारिकता राहिली आहे. इथल्या जनतेने त्यांना पाठिंबा दिलेला आहे तुम्ही काळीज नका करू तुमचं पार्सल सव्याज परत मुंबईत पाठवण्यास भाजप कार्यकर्ता सक्षम आहे. असा टोला तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी लगावला आहे.