उपचारांसाठी मोठ्या आर्थिक मदतीचं आवाहन

Edited by: विनायक गांवस
Published on: December 20, 2025 20:07 PM
views 26  views

सावंतवाडी : निरवडे येथील ५१ वर्षीय मार्शल डिसोजा यांची सध्या मृत्यूशी झुंज सुरू असून त्यांच्या उपचारांसाठी मोठ्या आर्थिक मदतीची आवश्यकता निर्माण झाली आहे. हृदयविकाराच्या तीव्र झटक्यामुळे त्यांच्यावर सध्या मुंबईतील विलेपार्ले येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र, उपचारांचा खर्च पेलणे कुटुंबाच्या आर्थिक क्षमतेबाहेर असल्याने समाजातील दानशूर व्यक्तींनी मदतीचा हात द्यावा, असे आवाहन त्यांचा मुलगा मिशेल डिसोजा व नातेवाईकांनी केले आहे.

मार्शल डिसोजा यांना काही महिन्यांपूर्वी हृदयविकाराचा झटका आला होता. सुरुवातीला स्थानिक स्तरावर उपचार केल्यानंतर, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना तातडीने मुंबईतील 'ऍडव्हान्स मल्टीस्पेशालिटी' रुग्णालयात हलवण्यात आले. सध्या त्यांच्यावर शस्त्रक्रिया, स्टेंट, आणि आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. या संपूर्ण प्रक्रियेसाठी साधारण १० लाख रुपयांच्या निधीची गरज आहे. डिसोजा कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने एवढी मोठी रक्कम उभी करताना त्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. एका कुटुंबाचा आधार वाचवण्यासाठी समाजातील दानशूर व्यक्ती, सामाजिक संस्था आणि लोकप्रतिनिधींनी सढळ हाताने मदत करण्याची विनंती करण्यात आली आहे. मदत करू इच्छिणाऱ्यांनी Michelle Marshal Dsouza 

7304166474 यांच्या नावावर, सेंट्रल बँक ऑफ इंडिया (खाते क्रमांक: 3856476734, IFSC कोड: CBIN0281294) या खात्यावर आपली मदत जमा करावी. ही रक्कम गुगल पे किंवा थेट बँक ट्रान्सफरद्वारे पाठवता येईल. आपला एक छोटासा वाटा मार्शल डिसोजा यांना पुन्हा नवजीवन मिळवून देऊ शकतो, असा विश्वास त्यांच्या मित्रपरिवाराने व्यक्त केला आहे.