सावंतवाडीत भव्य फ्लोट शोभायात्रा

Edited by: विनायक गांवस
Published on: December 20, 2025 20:05 PM
views 16  views

सावंतवाडी : नववर्ष २०२६ चे स्वागत आणि ख्रिसमसच्या पार्श्वभूमीवर शहरात भव्य फ्लोट शोभायात्रा ख्रिस्ती बांधवांकडून काढण्यात आली. सावंतवाडी कॅथोलिक असोसिएशनच्या माध्यमातून ही शोभायात्रा शहरातून काढण्यात आली. या शोभायात्रेस मोठा प्रतिसाद मिळाला.

येशूने दिलेला सामाजिक बांधिलकीचा संदेश या यात्रेतून देण्यात आला. सामाजिक प्रबोधन करणारे आकर्षक देखावे लक्षवेधी ठरले तर शहरातील युवकानी साकारलेला भव्यदिव्य ख्रिसमस रथ लक्ष वेधून घेत होता. या यात्रेदरम्यान सॅटासोबत सेल्फी घेण्याचा मोह बच्चेकंपनीसह मोठ्यांना देखील आवरता आला नाही. मिलाग्रीस हायस्कूलपासून या फ्लोटला सुरुवात झाली. ही शोभायात्रा पाहण्यासाठी मोती तलावा काठी मोठी गर्दी केली होती. यावेळी ख्रिस्ती बांधवांनी नाताळ व नववर्षाच्या शुभेच्छा सर्वांना दिल्या. याप्रसंगी ख्रिस्ती बांधवांचे फादर, सिस्टर यांसह फा. मिलेट डिसोजा, जॉय डॉन्टस, जेम्स बोर्जीस, रेमी आल्मेडा, आगस्तीन फर्नांडिस, रुजाय रॉड्रीक्स, फ्रान्सिस डिसोझा, मायकल आल्मेडा, क्लॅटस फर्नांडिस, बाबा आल्मेडा यासह मोठ्या संख्येने ख्रिस्ती बांधव तसेच शहरवासीय उपस्थित होते. यानिमित्ताने शहरात सर्वधर्मसमभावाचे प्रतिक देखील पाहायला मिळाले.