
वैभववाडी : सोनाळी बौद्धवाडी येथील अंकित पांडुरंग भोसले (वय - २३) हा तरुण सोमवारपासून (ता. २४ फेब्रुवारी) बेपत्ता झाला आहे.याबाबतची खबर त्याचे चुलते संतोष भोसले यांनी पोलीसांत दिली आहे.
अंकीत हा सोनाळी येथील आपल्या घरी चुलत्यांसोबत राहतो. तो रोजंदारीची कामे करतो. सोमवारी सकाळी घरातून निघताना आपण कामाला जातो असे सांगून निघाला. मात्र, तो सायंकाळी घरी परतलाच नाही. घरातील मंडळींनी त्याची नातेवाईकांसह इतर ठिकाणी चौकशी केली. मात्र, तो कुठेही सापडून आला नाही. अखेर चुलते संतोष भोसले यांनी आज पुतण्या बेपत्ता असल्याची खबर पोलीसात दिली आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.