'विनम्र सेवा भाव हा युवा उद्योजक विशाल परब यांचा दागिना'

विशाल गौरव सोहळ्यात भाजपचे प्रदेश सचिव निलेश राणे यांचे उदगार
Edited by: भरत केसरकर
Published on: October 16, 2022 08:49 AM
views 315  views

कुडाळ (भरत केसरकर) : विनम्र सेवा भाव हा युवा उद्योजक विशाल परब यांचा दागिना आहे. यांच्या या गुणांचा अंगीकार समाज घटकांनी करावा. पैसे सर्वांकडेच आहेत मात्र त्यातून समाजातील गरजू घटकांना आपण उपयोगी ठरू शकतो काय, याचा विचार करावा. वाढदिवस हे मनोरंजन करण्यासाठी नाहीत तर समाजाच्या दुर्लक्षित समाजाला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी असतात. ही मानसिकता ठेवून काम करणारा उद्योजक विशाल परब यांच्या कार्याचे अनुकरण करा, असे आवाहन भाजपचे प्रदेश सचिव आणि माजी खासदार निलेश राणे यांनी केले. 

माजी खासदार राणे म्हणाले, सांगली पलूसला गेलो तर बापू स्टेजवर यायला २० मिनिटे लागली.होतो. असा जल्लोष कोकणात दिसणार नाहीत. इथे मनातून प्रेम करणारी लोक आहेत, मात्र कधी गेम करतील ते कळत नाही. मी खासदार झालो तेव्हा सुद्धा ते प्रेम मला कळले नाही आणि माजी खासदार झालो तेव्हा सुद्धा मला येथील जनतेने प्रेम कळले नाही. या सभागृत तेव्हढी माणसे आहेत मात्र एकही माणूस उठत नाही म्हणजे विशाल परब यांचा कार्यक्रम यशस्वी झाला. असे प्रेम करणारी जनता येथील आहे. मालवणी ,कोकणी माणसाचे प्रेम असेच आहे. ते उघड होत नसते आणि कळतही नसते.


रत्नागिरी - सिंधदुर्ग जिल्ह्याचे बरसू रिफायनरी, जैतापूर प्रकल्प जेव्हा पूर्ण होतील तेव्हा खऱ्या आर्थाने विकासाचे परिवर्तन होईल.  त्यासाठी व्हिजन असावे आणि नारायण राणे यांच्यासारख्या नेतृत्वात ते व्हिजन आहे. दूरदृष्टी आहे,  त्यामुळे आज सिंधुदूर्ग बदललेला दिसतो.  तो आजुन पुढे नेवूया यासाठी मानसिकता बदला, असे आवाहन निलेश राणे यांनी केले.

यावेळी भाजपचे प्रदेश सचिव निलेश राणे, भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली, माजी आमदार प्रमोद जठार, पद्मश्री परशुराम गंगावणे, भाजपा जिल्हा प्रवक्ते संजू परब, विशाल परब, सौ. वेदिका परब, कु. विराज व भार्गवी, भाजपा तालुकाध्यक्ष दादा साईल, जिल्हा बँक संचालक प्रकाश मोर्ये, माजी जि.प. अध्यक्ष अशोक सावंत, संध्या तेरसे, रविंद्र परब, आनंदी परब, विद्याधर परब, प्रभाकर परब, आनंद परब, अनिल पाटील, विनोद चव्हाण, आनंद शिरवलकर, ॲड. अनिल निरवडेकर,पांडू सावंत, मोहन सावंत, दिपक नारकर, रामा धुरी, सचिन धुरी, रवि राऊळ, आबा निचम, सूरज कदम, विनायक राणे, रुपेश कानडे, प्रसन्न गंगावणे, संदिप साटम, स्वरूप नारकर, साई भोई, कृष्णा सावंत, बाळू देसाई, दीपक खरात, आनंद परब, प्रथमेश कामत, ॲङ सूर्या राव, तेजस माने, प्रशांत पाटील, गंगाराम गुरव, योगेश पेंडसे, बापू तेंडुलकर, विठ्ठल जंगले, बापू नाईक, राजन नाईक यांसह अन्य भाजपा पदाधिकारी व विशाल परब मित्रमंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


विशाल परब यांना यानिमित्त जिल्हाध्यक्ष राजन तेली, माजी आमदार प्रमोद जठार, संजू परब, प्रकाश मोर्ये यांनीही यावेळी शुभेच्छा दिल्या. या विशाल परब मित्रमंडळातर्फे निलेशजी राणे, आ. शहाजी बापू पाटील, प्रमोद जठार, राजन तेली, पद्मश्री परशुराम गंगावणे यांचा विशाल परब यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तत्पूर्वी या गौरव सोहळ्यानिमित्त ज्येष्ठ गायक पं. अजित कडकडे यांच्या बहारदार गायनाचा कार्यक्रम झाला. तसेच युवा किर्तनकार चैतन्य महाराज वाडेकर यांचा किर्तन सोहळा तसेच जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांचा सत्कार सोहळा झाला.


राज्य व जिल्हा स्तरावर नावलौकिक मिळवलेल्या कलाकार, साहित्यिक व क्रीडापटुंचा यावेळी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक दादा साईल तर सुत्रसंचालन राजा सामंत व बादल चौधरी यांनी केले.