आनंदी निरोगी आयुष्यासाठी योग महत्वाचा : प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश संजय भारुका

Edited by: देवयानी वरसकर
Published on: June 21, 2023 20:09 PM
views 90  views

सिंधुदुर्गनगरी :  मन, बुध्दी आणि शरीराला योग स्थिर करणारे आहे. त्यामुळे आनंदी, निरोगी आयुष्य जगू शकतो. त्यासाठी नेहमी योग करा, असे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्याया‍धीश संजय भारुका यांनी केले.* 

येथील जिल्हा क्रीडा संकुलात दिनाचे आयोजन करण्यात आले होते. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. भारुका यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करुन आणि धन्वंतरी मूर्तीला पुष्पहार अर्पण करुन  कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव अनिता कुरणे, अधिष्ठाता डॉ. प्रकाश गुरव, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) विशाल तनपुरे, जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस,तहसीलदार श्रीधर पाटील, परिविक्षा आय.ए.एस. अधिकारी विशाल खत्री, नेहरु युवा केंद्राचे कार्यक्रम सहायक अपेक्षा मांजरेकर आदी उपस्थित होते. 

न्यायधीश श्री. भारुका म्हणाले, आयुर्वेदात योगाचे महत्व सांगितलेले आहे. दररोज योग करुन निरोगी रहा. योगामुळे निरोगी आयुष्य जगू शकतो.त्यामुळे जगाने त्याची दखल घेतली. आयुष्य आनंदी, निरोगी ठेवण्यासाठी नेहमीसाठी योग करावा. असेही ते म्हणाले.

यावेळी साधना गुरव यांनी योगासनाची प्रात्यक्षिके देवून उपस्थितांकडून योगासने करवून घेतली. आयुषच्या डॉ. कृपा गावडे यांनी कार्यक्रमाचे स्वागत करुन सूत्रसंचालन केले. यावेळी सहायक संचालक बाळासाहेब पाटील, माविमचे जिल्हा समन्वयक नितीन काळे, आशालता जमने, प्र. सहायक आयुक्त जी.पी. बिटुडे, न्यु इंग्लिश स्कूल, डॉन बॉस्को स्कूल, नर्सिंग, वैद्यकीय महाविद्यालय आणि आय. टी. आय. चे विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.