
दोडामार्ग : श्री दत्तपद्मनाभ पीठ सद्गुरु फाऊंडेशनच्या वतीनं आंतरराष्ट्रीय योग दिवस दोडामार्ग शहरात महालक्ष्मी हाँल येथे साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात विशेष अतिथी मान्यवर म्हणून दोडामार्ग नगराध्यक्ष चेतन चव्हाण उपस्थित होते. त्याचप्रमाणे मणेरी गावचे ग्रामस्थ श्री दत्त उपासक सखाराम सावंत, संत समाज दोडामार्गचे क्षेत्रिय प्रमुख महेश शेटकर, अध्यक्ष सुभाष गवंडे उपस्थित होते. यावेळी योग दिवसाचे औचित्य साधून शहरात मोठ्या उत्साहात आणि आनंदाने नागरिक, आणि योग अभ्यासकांनी आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला.