भाजपा वेंगुर्लेच्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिन निमीत्त "योगाभ्यास"

खर्डेकर महाविद्यालय प्राध्यापक , माझा वेंगुर्ला , रोटरी क्लब , डाॅक्टर , वकिल तसेच नागरीकांचा सहभाग
Edited by:
Published on: June 21, 2024 06:15 AM
views 149  views

वेंगुर्ले : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ जुन - आंतरराष्ट्रीय योग दिन निमित्त देशभरातील जनतेस विविध शिबीरात सहभागी होऊन साजरा करण्याचे आवाहन केले . या आवाहनाला साद देत भाजपा वेंगुर्ले च्या वतीने कॅम्प मैदानावरील तालुका क्रीडा केंद्राच्या बॅडमिंटन हाॅल मध्ये योग शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी योग शिक्षिका साक्षी बोवलेकर यांनी योगाभ्यास घेतला. या शिबिरात रोटरी क्लब , माझा वेंगुर्ला , खर्डेकर महाविद्यालयातील शिक्षक व एन.सी.सी.कॅडेट , डाॅक्टर , वकिल , खेळाडु तसेच नागरिक सहभागी झाले होते. 

याप्रसंगी योग कार्यक्रम संयोजक नगराध्यक्ष राजन गिरप यांनी सर्व मान्यवरांचे पुष्प देऊन स्वागत केले. तसेच सहसंयोजक अँड. सुषमा प्रभूखानोलकर यांच्या हस्ते योगशिक्षिका साक्षी बोवलेकर यांचा शाल घालून सत्कार करण्यात आला.

यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई, तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, महीला तालुकाध्यक्षा सुजाता पडवळ, महीला मोर्चाच्या वृंदा गवंडळकर, वृंदा मोर्डेकर, श्रेया मयेकर, उर्वी गावडे, सुरेंद्र चव्हाण, बुथप्रमुख रविंद्र शिरसाठ इत्यादी भाजपा कार्यकर्ते सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नगरसेवक प्रशांत आपटे यांनी केले.