जिल्हास्तरीय योगासन विभागीय स्पर्धेसाठी संघ जाहीर

Edited by: मनोज पवार
Published on: October 03, 2024 11:27 AM
views 141  views

रत्नागिरी : जिल्हास्तरीय योगासन स्पर्धा रा. भा. शिर्के प्रशालेमध्ये झाली. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. स्पर्धेत स्पंदन धामणे, मान्या नाईक, संजय परमार, सलोनी शिर्के, आर्य हरचकर, स्वराली तांबे या विद्यार्थ्यांनी आपापल्या गटांमध्ये प्रथम क्रमांक पटकावले.

स्पर्धेत रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. स्पर्धेचे उद्घाटन प्रशालेच्या पर्यवेक्षिका श्रीमती जाधव व रत्नागिरी जिल्हा योग असोसिएशनचे अध्यक्ष राजेश आयरे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी रत्नागिरी जिल्हा योगा असोसिएशनचे सचिव किरण सनगरे व सर्व शाळांचे क्रीडाशिक्षक व आंतरराष्ट्रीय योगपटू उपस्थित होते. विजेत्यांचे अभिनंदन रत्नागिरी योगा असोसिएशनच्या सर्व सदस्य व क्रीडाशिक्षक, क्रीडा अधिकारी यांनी केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

विजयी विद्यार्थी असे ः 14 वर्षाखालील मुले- स्पंदन धामणे, अर्णव जोशी, अजिंक्य पोटे. ऱ्हीदमिक योगा- स्पंदन धामणे; 14 वर्षाखालील मुली- योगासन- मान्या नाईक, दिया सावर्डेकर, ईश्वरी खेराडे; ऱ्हीदमिक योगा- मान्या नाईक; आर्टिस्टिक योगा- ईशदा भोसले.

17 वर्षाखालील मुले- योगासने- संजय परमार, सोहम बडवे, ऋग्वेद चव्हाण; ऱ्हीदमिक योगा- ऋग्वेद चव्हाण. 17 वर्षाखालील मुली- योगासने- सलोनी शिर्के, प्रांजल आंबेडे, सौम्या मुकादम; ऱ्हीदमिक योगा- सलोनी शिर्के, आर्टिस्टिक योगा- प्रांजल आंबेडे. 19 वर्षांखालील मुले- योगासने- आर्य हरचकर, प्रतीक पुजारी, रत्नेश आडविरकर; ऱ्हीदमिक योगा- प्रतीक पुजारी, आर्टिस्टिक योगा- आर्य हरचकर; 19 वर्षाखालील मुली- स्वराली तांबे, सृष्टी धुळप, आराध्या तांबे; ऱ्हीदमिक योगा- स्वराली तांबे.