
देवगड : संपूर्ण जगाने योग स्वीकारला आहे ही आपल्या भारतासाठी गौरवाची बाब आहे’,असे प्रतिपादन माजी आमदार अजित गोगटे यांनी जागतिक योगदिनाचे औचित्य साधून देवगड जामसंडे येथील मोरेश्वर जनार्दन गोगटे सांस्कृतिक भवन येथे भारतीय जनता पार्टी देवगड मंडल आणि विद्या विकास मंडळ जामसंडे च्यावतीने योग प्रशिक्षण आणि प्रात्यक्षिक शिबीर आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलताना केले. यावेळी मा.आमदार अजित गोगटे यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले. यावेळी बाळ खडपे उपाध्यक्ष भाजपा, या कार्यक्रमाच्या संयोजिका तसेच उपाध्यक्षा प्रियांका साळसकर, अध्यक्ष राजा भुजबळ, महिला अध्यक्षा उषःकला केळुसकर,शरद ठुकरुल, नगरसेविका तन्वी चांदोस्कर,आद्या गुमास्ते योगेश चांदोस्कर,दया पाटील, सहसंयोजक वैभव करंगुटकर, मृणालिनी भडसाळे, योग प्रशिक्षक खाडीलकर, सौ.काटदरे, मुख्याध्यापक सुनिल जाधव तसेच विद्यार्थी शिक्षक, कर्मचारी उपस्थित होते.
पुढे बोलताना ते म्हणाले आ.अजित गोगटे म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदा पंतप्रधान झाल्यावर संयुक्त राष्ट्राच्या परिषदेत आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्याचा ठराव मांडला आणि १२७ देशाच्या मान्यतेने तो मंजूर झाला योगाची ही अनमोल देणगी जपण्याचे आणि तिला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. ‘योग हे माणसाला आरोग्यपूर्ण, उत्साहपूर्ण जीवन देणारे शास्त्र आहे.संपूर्ण जगाने योग स्वीकारला आहे ही आपल्या भारतासाठी गौरवाची बाब आहे’, असे प्रतिपादन प्रतिपादन माजी आमदार अजित गोगटे यांनी यावेळी बोलताना केले. यावेळी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते तसेच विद्यार्थी देखील बहुसंख्येने मोठ्या संख्येने उपस्थित होते.