
वैभववाडी : अर्जुन रावराणे विद्यालय व श्री.जयेंद्र दत्ताराम रावराणे सेमी इंग्लिश स्कूल वैभववाडी येथे आज (ता.२१) जागतिक योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी क्रीडा शिक्षक एस. टी.तुळसणकर यांनी गायत्री मंत्र व योग शिक्षक व्हि एस मरळकर यांनी मृत्युंजय मंत्र म्हणून योग प्रात्यक्षिकांना सुरुवात केली. विद्यालयातील सर्व विद्यार्थी व शिक्षक तसेच पतंजली योग समिती वैभववाडीच्या पदाधिकाऱ्यांनी अनेक योग प्रात्यक्षिके सादर केली.
यावेळी योगा, प्राणायाम, व्यायामाचे दैनंदिन जीवनातील महत्व याबाबत विद्यार्थ्यांना प्रशालेचे शिक्षक एस.बी.शिंदे यांनी मार्गदर्शन केले. तर योग शिक्षक व्ही एस मरळकर, क्रिडा शिक्षक एस.टी.तुळसणकर तसेच प्रशालेतील एन.सी.सी. विभागाच्या विद्यार्थ्यांनी अनेक योग प्रात्यक्षिकांचे यावेळी सादरीकरण केले.
यावेळी वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे, प्रशालेचे मुख्याध्यापक बी. एस. नादकर, वैभववाडी नगरपंचायतच्या नगराध्यक्षा श्रद्धा रावराणे, प्राची तावडे, वैभववाडी तालुका तालुका पतंजली समितीच्या महिला पदाधिकारी व प्रशालेचे सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.