यशवंतराव भोसले इंटरनॅशनलच्या 10 उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार !

Edited by: विनायक गांवस
Published on: June 19, 2024 06:38 AM
views 176  views

सावंतवाडी : यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूल मध्ये इयत्ता दहावीच्या (सीबीएसई बोर्ड) विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न झाला. शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मध्ये ए वन श्रेणीत उत्तीर्ण झालेल्या आर्यन हिर्लेकर, ऋतुजा गावडे, ऋषी लेले, तन्मय कुमार, शौनक नर, स्वरांगी आंगचेकर, विराज सावंत, जान्हवी देसाई या विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

 यावेळी शाळेचे माजी विद्यार्थी तसेच पालक वर्ग उपस्थित होता. संस्थेचे कार्याध्यक्ष अच्युत सावंत भोसले, अध्यक्षा अस्मिता सावंत भोसले, प्रशासकीय अधिकारी सुनेत्रा फाटक व मुख्याध्यापिका प्रियांका देसाई यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.