
वैभववाडी : आचिर्णे जंगलात सापडलेल्या केरळीयन महिलेला वैभववाडी पोलिसांनी तत्परतेने शोधून काढत सुरक्षितपणे तिच्या नातेवाईकांच्या ताब्यात दिले.कुंजामिनो कुण्णीमोईद्दीन कुटी(वय५८)असं या महीलेच नाव आहे.ती बुधवारी रात्री आचिर्णे येथील जंगलात निपचित पडून होती. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी (ता २१ जाने) रात्री सुमारे १० वाजण्याच्या सुमारास वैभववाडी पोलीस निरीक्षक यांना आचिर्णे गावातून फोन आला.त्यांनी आचिर्णे येथील जंगलात एक अनोळखी महीला असल्याची माहिती दिली.
त्यानुसार पोलीस शैलेंद्र कांबळे,धनाजी धडे, श्री हाके,श्री कांबळे,महीला पोलीस श्रीमती पाटोळे हे घटनास्थळी पोहोचले.त्यांना येथील जंगलात काळे कपडे परिधान केलेली महीला सापडली. या महीलेला पोलीस स्थानकात आणले.तिच मानसिक स्वास्थ्य ठिक नसल्याने तिला नीट पत्ताही सांगता येत नव्हता.बराचवेळ तिच्याशी बोलल्यानंतर ती केरळ तिरुर येथील असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले.त्यांनतर संबंधीत पोलिस ठाण्यात तिची दुरध्वनीवरुन माहिती देण्यात आली.तेथे ती बेपत्ता असल्याची तक्रार तिच्या नातेवाईकांनी तिरुर पोलीस स्थानकात २०जानेवारीला दिली होती.तेथील पोलीस व तिचे नातेवाईक शुक्रवारी वैभववाडी पोलीस स्थानकात पोहचले.त्यांनंतर सदर महीलेला वैभववाडी पोलीसांनी त्यांच्या नातेवाईकांच्या स्वाधीन केले.
ही कार्यवाही वैभववाडी पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मनोज सोनवलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीसांनी पुर्ण केली. पोलीसांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे बेपत्ता महिलेचा शोध लागला.पोलीसांच्या या कामगिरी बद्दल नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.










