यशवंतराव भोसले स्कूलमध्ये 'संवाद लेखकांशी'

Edited by: विनायक गांवस
Published on: July 31, 2024 12:37 PM
views 357  views

सावंतवाडी : केरळमध्ये जन्मलेल्या व पेशाने शिक्षक असलेल्या पी.एन.पन्नीकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ संपूर्ण देशात राष्ट्रीय वाचन महिना साजरा करण्यात आला. याचेच औचित्य साधून यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलमध्ये 'संवाद लेखकांशी' या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून पंचम खेमराज महाविद्यालयाच्या प्राध्यापिका डॉ. प्रगती नाईक उपस्थित होत्या. डॉ.नाईक यांनी विद्यार्थ्यांना ग्राफिकल नॉवेल या साहित्य प्रकाराविषयी माहिती दिली. ग्राफिकल नॉवेल लिहिताना कोणकोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी तसेच संकल्पना, पात्रांची निवड, विविध पायऱ्यांचा अवलंब याचीही माहिती दिली. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन करण्यात आले. सूत्रसंचालन क्रेसिडा डिसोजा व आभारप्रदर्शन विजया गोडकर यांनी केले.