यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूटमध्ये 'अभियंता दिन' उत्साहात

Edited by: विनायक गांवस
Published on: September 15, 2024 11:43 AM
views 114  views

सावंतवाडी : भोसले नॉलेज सिटीमधील यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये 'इंजिनियर्स डे' अर्थात 'अभियंता दिन' मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कॉलेजचे प्राचार्य डॉ.रमण बाणे हस्ते दीपप्रज्वलन करून व उपप्राचार्य गजानन भोसले यांच्या हस्ते डॉ.एम.विश्वेश्वरैय्या यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

'फादर ऑफ इंजिनिअरिंग' म्हणून ज्यांना ओळखले जाते अशा भारतरत्न डॉ.मोक्षगुंडम विश्वेश्वरैय्या यांच्या जयंती निमित्त दरवर्षी 15 सप्टेंबर रोजी संपूर्ण देशात अभियंता दिन साजरा केला जातो. स्वातंत्र्योत्तर काळात देशातील महत्वाच्या पायाभूत सुविधा निर्माण करण्यामध्ये डॉ.विश्वेश्वरय्या यांचे मोलाचे योगदान होते. विद्यार्थ्यांना डॉ.विश्वेश्वरय्या यांचे कार्य समजावे तसेच अभियंता म्हणून सामाजिक जबाबदारीची जाणीव व्हावी यासाठी भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये दरवर्षी अभियंता दिन साजरा करण्यात येतो. कार्यक्रमाला डिग्री व डिप्लोमा विभागाचे सर्व  विभागप्रमुख, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन कॉलेजच्या सिव्हिल विभागाच्या वतीने करण्यात आले.