
सावंतवाडी : भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या गौरवपूर्ण निमित्ताने यशवंतराव भोसले सैनिक स्कूल यांच्या वतीने “सॅल्यूट टू सर्व्हिस – आजी माजी सैनिक स्नेहमेळावा" 26 जानेवारी 2026 रोजी यशवंतराव भोसले सैनिक स्कूल, सावंतवाडी येथे आयोजित करण्यात आला आहे. हा स्नेहमेळावा देशसेवेसाठी आपले आयुष्य समर्पित करणाऱ्या माजी सैनिकांच्या त्याग, शिस्त व सेवेला मानवंदना देण्यासाठी आयोजित करण्यात येत आहे. या माध्यमातून माजी सैनिकांमध्ये संवाद, आठवणींचे आदान-प्रदान तसेच युवा पिढीसाठी प्रेरणादायी वातावरण निर्माण करण्याचा उद्देश आहे.
कार्यक्रमास माजी सैनिक व त्यांचे कुटुंबीय, शिक्षणतज्ज्ञ तसेच संरक्षण क्षेत्रात करिअर करू इच्छिणारे विद्यार्थी उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमात यशवंतराव भोसले सैनिक स्कूलचे कमांडंट ले.कर्नल रत्नेश सिन्हा (नि) हे संरक्षण क्षेत्राभिमुख शिक्षण, शिस्तबद्ध प्रशिक्षण व लष्करी संस्कारांद्वारे सैन्य अधिकारी घडविण्याबाबत मार्गदर्शन करतील. स्नेहमेळाव्यानंतर भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. या उपक्रमातून माजी सैनिकांचा सन्मान तसेच विद्यार्थ्यांमधील राष्ट्रभक्ती व नेतृत्वगुणांना चालना देण्याचा शाळेचा प्रयत्न आहे. तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त सैनिकांनी या स्नेहमेळाव्यासाठी उपस्थित रहावे असे आवाहन यशवंतराव भोसले सैनिक स्कूलतर्फे करण्यात आले आहे. नाव नोंदणीसाठी व अधिक माहितीसाठी 9167077940 या क्रमांकावर संपर्क साधावा, असं आवाहन केलं आहे











