युवराज लखमराजे, युवराज्ञी श्रद्धाराजे यांच्या हस्ते श्री देव पाटेश्वराच पूजन, अभिषेक

जिल्ह्यासह गोव्याच्या कानाकोपऱ्यातून भक्तगण सावंतवाडीत दाखल
Edited by: विनायक गांवस
Published on: August 22, 2022 09:02 AM
views 391  views

सावंतवाडी : श्रावणातल्या शेवटच्या सोमवारी, सावंतवाडीचं श्रद्धास्थान राजघराण्याच दैवत श्री देव पाटेकर चरणी लीन होण्यासाठी जिल्ह्यासह गोव्याच्या कानाकोपऱ्यातून भक्तगण सावंतवाडीत दाखल झाले होते. सकाळी युवराज लखमराजे भोंसले, युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले यांच्या हस्ते श्री देव पाटेश्वराच पूजन, अभिषेक करण्यात आला.

सावंतवाडीचे श्रद्धास्थान आराध्यदैवत, संस्थानकालीन श्री देव पाटेकर देवस्थान शेवटच्या श्रावणी सोमवारनिमित्त भक्तांच्या गर्दीन फुलून गेलं होतं. सकाळी राजघराण्याचे युवराज लखमराजे भोंसले, युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले यांच्या हस्ते विधिवत पूजा झाली.यावेळी राणीसाहेब शुभदादेवी भोंसले उपस्थित होत्या. पुजेनंतर श्री देव पाटेकर दर्शन भाविकांसाठी खुलं करण्यात आलं. सावंतवाडीसह जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून तसेच गोव्याहून आलेल्या भक्तांनी श्री देव पाटेकराच दर्शन घेतले. शिवनामजपात शिवभक्त तल्लीन झाले होते.