चिपळूणमध्ये जागतिक पांढरी काठी दिन

नॅब चिपळूणचा उपक्रम
Edited by: मनोज पवार
Published on: October 16, 2025 15:17 PM
views 106  views

चिपळूण : जागतिक पांढरी काठी दिनानिमित्त जिल्हा शाखा रत्नागिरी च्या वतीने चिपळूण शहरांमध्ये इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राजवळ जागतिक पांढरी काठी दिन साजरा करण्यात आला. यावेळी इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रासमोरील रस्त्यावर पांढरी काठीसह दृष्टिहीन दिव्यांगाना रस्ता ओलांडण्याचे प्रात्यक्षिक देण्यात आले. 10  दृष्टीहीन दिव्यांगांचा समावेश होता. या कार्यक्रम प्रसंगी आज पांढरी काठी दिन हीच माझी वाणी, आम्ही नाही दुर्बळ आमची वेगळी कहाणी अशा घोषणा देण्यात आल्या. 

या कार्यक्रमासाठी नॅब या संस्थेचे अध्यक्ष निलेश भुरण, उपाध्यक्ष इब्राहिम दलवाई, कार्यवाह भरत नांदगावकर, संचालक  ॲड. विवेक रेळेकर, प्रकल्प अधिकारी संदीप नलावडे, शिक्षण विस्तार अधिकारी सौरवी संतोष जाधव, पोलीस कर्मचारी श्री. रसाळ, मयूर चव्हाण, वैभव फके, सुरज वरवाटकर उपस्थित होते.

या कार्यक्रमप्रसंगी मान्यवरांनी उपस्थित अंध बांधवांना मार्गदर्शन केले व अंधकाठी दिनाचे महत्त्व सांगितले. याप्रसंगी प्रकल्प अधिकारी संदीप नलावडे यांनी अंध काठी ही दृष्टिहीन दिव्यांगांसाठी जीवनसाथी आहे असे सांगितले. शिक्षण विस्तार अधिकारी सौरवी जाधव यांनी हा अंधकाठी दिन  हा अंध मानवांना अतिशय प्रेरणा देणारा आहे असे संबोधित केले. त्याचबरोबर त्यांनी पांढऱ्या काठीचे महत्त्व विशद करताना या काठीमुळे अंध बांधवांना स्वतःचा आत्मविश्वास मिळू शकतो. ते आपल्या जीवनाचा आनंद घेऊ शकतात. यावेळी अंध बांधवांच्या चेहऱ्यावर अतिशय आनंदाचे भाव उमटलेले दिसून आले.