
चिपळूूण : शरदचंद्रजी पवार अन्नतंत्रज्ञान महाविद्यालय, खरवते-दहिवली मध्ये दि.16 आॅकटोबर, जागतिक अन्नदिनाचे ओचित्य साधुन अन्नतंत्रज्ञान शाखेतील सर्व विद्यार्थ्यांकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुनितकुमार पाटील यांचे मार्गदर्शनाखाली महाविद्यालयामधील विद्यार्थ्यांकडून विविध अन्न पदार्थांचे प्रदर्शन भरविण्यात आले.या कार्यक्रमाचे उद्घाटन राधा गोविंद फाऊंडेशन चे कार्याध्यक्ष अनिरुद्ध शेखर निकम, सिद्धार्थ प्रशांत निकम, सह्याद्रि शिक्षण संस्थेचे संचालक मारुतराव घाग, प्रकाशजी राजेशिर्के, सिद्धि उद्योग केंद्राचे प्रमुख प्रसन्न अडविलकर, योजक फुड्स च्या संचालिका मुक्ता भिडे ई.मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले.यावेळेस महाविद्यालयातर्फे अन्न प्रक्रिया उद्योगात विद्यार्थ्यांचे योगदान वाढविण्यासाठी प्रसन्न अडविलकर व मुक्ता भिडे यांचे मार्गदर्शन पर व्याख्यान देखील आयोजित करण्यात आले.
या मधे मार्गदर्शकांनी अन्नप्रक्रीया उद्योग कसा सुरु करावा, भांडवल निर्मिती, संसाधनाचा योग्य वापर, विपणन व निर्यात यावर सखोल मार्गदर्शन केले.अनिरुद्ध निकम यांनी आपल्या मार्गदर्शना मध्ये परदेशामध्ये अन्नतंत्रज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना असणार्या संधी या विषयावर मार्गदर्शन केले.अन्नपदार्थ प्रदर्शनामध्ये विद्यार्थ्यांकडून नाविन्यपूर्ण व उत्कृष्ट अश्या पदार्थाचे प्रदर्शन भरविण्यात आले. कृषि मालापासून प्रक्रीया करून विविध पदार्थ बनविण्यात येवु शकतात व यापासुन स्वतःचा खुप चांगला उद्योग होवु शकतो हा संदेश पोहचवणे हा या प्रदर्शनाचा मुख्य उद्देश होता.हे सर्व कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी महाविद्यालयामधील सर्व प्राध्यापक वर्ग व विद्यार्थ्यी यांनी विशेष परिश्रम घेतले.