
मालवण : शासकीय तंत्रनिकेतनमधील विद्यार्थ्यांमधून उद्योजक घडावेत यासाठी डाॅ. हेडगेवार प्रकल्पाकडून सर्व प्रकारचे सहकार्य नेहमी केले जाईल, असे प्रकल्पाचे अध्यक्ष सुनील उकिडवे यांनी आज जाहीर केले. शासकीय तंत्रनिकेतन, मालवण मधील अन्नतंत्रज्ञान विभागातर्फे आयोजित करण्यात आलेल्या जागतिक अन्न दिनानिमित्तच्या कार्यक्रमात सुनील उकिडवे बोलत होते.
यावेळी जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक श्रीपाद दामले व ‘क्रीमबर्ग' कंपनीचे मालक रघुनाथ राणे उपस्थित होते. या मान्यवरांनी विद्यार्थ्यांना अन्न तंत्रज्ञानातील सध्याची प्रगती व दिशा या अनुषंगाने मार्गदर्शन केले.
अन्न प्रक्रिया उद्योगातील संधी व कौशल्ये, तसेच यासाठीच्या शासकीय योजना याबाबत माहिती देण्यात आली. यानिमित्ताने प्रश्न मंजुषा स्पर्धा (क्वीझ काॅम्पिटेशन) घेण्यात आली या स्पर्धेतील प्रथम तीन क्रमांक अनुक्रमे
१ राजस शेणई.
२ रोहन सावंत.
३ ऋतुराज मालणकर
यांनी पटकावले .
यावेळी अन्न तंत्रज्ञान विभागाचे विभाग प्रमुख प्रकाश शिरहट्टी, प्रा संजय तलवारे , प्रा.राहुल बोर्डे, प्रा.गणेश सामंत उपस्थित होते. सर्वेश नाईक याने आभार मानले तर स्वानंद सप्रे याने सूत्रसंचालन केले.