
सावंतवाडी : महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाने मेकॅनिकल विभागाच्या शिक्षकांसाठी 'इंडस्ट्रियल वेल्डिंग सोल्युशन्स' या विषयावर कार्यशाळा आयोजित केली होती. एल अँड टी स्किल ट्रेनर्स अकॅडमी, मढ-मुंबई येथे ३ ते ७ मार्च २०२५ या कालावधीत ही कार्यशाळा संपन्न झाली. यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या मेकॅनिकल विभागाचे अधिव्याख्याता महेश पाटील यामध्ये सहभागी झाले होते.
इंडस्ट्रीयल वेल्डिंग हे मोठी स्ट्रक्चर्स, जड उपकरणे आणि मशिन्स तयार करण्यासाठी वापरतात. यासाठी आजकाल आधुनिक व अचूक वेल्डिंग तंत्रांचा वापर केला जातो. पाच दिवस चाललेल्या या प्रशिक्षण वर्गात निरनिराळ्या वेल्डिंग मेथड, मॉडर्न टेक्नॉलॉजीची ओळख आणि सॉफ्ट स्किल्स असे विषय शिकवण्यात आले. यावेळी प्रॅक्टिकल सेशन्ससुद्धा घेण्यात आले.ट्रेंनिंग संपल्यानंतर सर्व प्रशिक्षणार्थी शिक्षकांना एमएसबीटीईतर्फे प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. समारोप प्रसंगी मनोगत व्यक्त करताना पाटील यांनी एमएसबीटीई, एल अँड टी आणि कॉलेजचे आभार मानले. अशा प्रशिक्षण वर्गामुळे तंत्रशिक्षण क्षेत्रातील गुणवत्ता सुधारण्यास मदत होत असल्याचे ते म्हणाले. संस्थेचे कार्याध्यक्ष अच्युत सावंतभोसले यांचा आवर्जून उल्लेख करत समस्येवर उपाय शोधण्याचा त्यांचा स्वभावगुण सर्वाना सांगितला. वेल्डिंग टेक्नॉलॉजी मधील आधुनिक बदल आणि सॉफ्ट स्किल्स यांचा विद्यार्थ्यांना मोठा फायदा होईल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.