BSNL कोल्हापूर विभागीय मंडळाची कार्यशाळा माडखोलमध्ये...!

Edited by: विनायाक गावस
Published on: June 24, 2023 15:38 PM
views 84  views

सावंतवाडी : BSNL कोल्हापूर विभागीय मंडळाची कार्यशाळा आज माडखोल धवडकी शाळेत संपन्न झाली. विभागीय मंडळ कोल्हापूर व सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आज शाळा माडखोल नं . २  धवडकी येथे संदेशवहन व BSNL टेक्नॉलॉजी  या विषयीची कार्यशाळा संपन्न झाली . याप्रसंगी डॉ . अनघा भोसले - ( DGM -BSNL कोल्हापूर ) रविकिरण जन्नू (DGM BSNL सावंतवाडी ) , सुनिल सुर्यवंशी ( DE . सावंतवाडी ) , प्रल्हाद पुण्यवंत ( SDE  सावंतवाडी ) व इतर मान्यवर उपस्थित होते .  संदेशवहनाची कार्यप्रणाली समजावताना BSNL च्या विविध टेक्नॉलॉजीची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली . यावेळी शाळेच्या सर्व विद्यार्थ्यांना BSNL कडून एक टिफीन  डबा व बिस्किट पुडा देण्यात आला . यावेळी बहुसंख्य पालकही उपस्थित होते.