व्यावसायिकांसाठी ओरोस इथं १० फेब्रुवारीला कार्यशाळा !

उद्योग मंत्रालय - नॅस्कॉम यांचं आयोजन
Edited by: देवयानी वरसकर
Published on: February 07, 2024 15:00 PM
views 88  views

सिंधुनगरी : सुक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय व नॅस्कॉमच्या सहकार्याने १० फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी ११.०० वाजता शरद कृषी भवन ओरोस येथे लहान व मध्यम उद्योग व्यवसायिकांसाठी एम.एस.एम.एस.ई सशक्तीकरण रणनीतीक टेक्नोलॉजी च्या मदतीने व्यवसाय वृद्धी, डिजिटल मार्केटिंग, एम.एस.एम.ई. साठी व्यवसाय वृद्धीसाठी पुढचे मार्ग या विषयांवर नँस्कॉम च्या वतीने व सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या सहकार्याने ओएनडीसी, मेटा (फेसबुक), जिओ या आस्थापनांचे अधिकारी मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती केंद्रीय मंत्री नारायणराव राणे, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय यांची असून उपस्थितांना ते यावेळी विशेष संबोधित करणार आहेत.                                       

या कार्यक्रमाचा एक भाग म्हणजे डिजिटल मार्केटिंग तज्ञांचे सत्र आहे. ज्या डिजिटल मार्केटिंगची मूलभूत माहिती ऑनलाईन तयार करणे आणि डिजिटल मार्केटची ताकद वापरून व्यवसाय कसा सक्षम करायचा आणि ग्राहकांना प्रभावीपणे कसे प्रतिबद्ध ठेवायचे याची माहिती या कार्यक्रमात दिली जाणार आहे.                                                       

या कार्यक्रमास उपस्थित लोक त्यांच्या व्यवसायासाठी त्वरीत अंमलबजावणी करू शकतील अशा प्रभावी उपायांसह व्यावसायिकांची नवीन व्यवसायासंबंधी आवड निश्चित करुन सदर व्यवसायाबाबत अपेक्षीत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.