
सावंतवाडी : राज्य शासनाच्या जुलै 2024 च्या अर्थसंकल्पात महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांच्या प्रयत्नातून व त्यांच्या माध्यमातून सावंतवाडी मतदारसंघातील 18 कोटी 95 लाखाचा निधी मंजूर झाला आहे. त्यासाठी मतदारसंघातील सर्व नागरिकांनी अभिनंदन करून आभार व्यक्त केलेले आहेत अशी माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी यांनी दिली आहे.
यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील कनेडी कुपवडे कडावल नारूर वाडोस शिवापुर शिरशिगे रस्ता रुंदीकरण व सुधारणा 2 कोटी 70 लक्ष,सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील वेंगुर्ला आकेरी आंबोली बेळगाव रस्ता यामध्ये अपघात प्रवण क्षेत्राची सुधारणा 2 कोटी, दोडामार्ग तालुक्यातील बांदा दोडामार्ग आयी रस्ता सुधारणा व डांबरीकरण 4 कोटी, तिलारी घोडगेवाडी पारगड रस्ता सुधारणा व डांबरीकरण 4 कोटी, वेंगुर्ला तालुक्यातील बोर्डी ठाणे न्हावाशेवा रेवस विजयदुर्ग मालवण वेंगुर्ला शिरोडा सातार्डा प्रमुख राज्यमार्ग सुधारणा व डांबरीकरण 2 कोटी 25 लक्ष निधी मंजूर करण्यात आला आहे.
या कामामुळे मतदार संघातील खेड्यापाड्यातील लोकांच्या वाहतूक व्यवस्थेची चांगल्या प्रकारे सोय होणार आहे. अनेक गावे, वाड्या मार्गाला जोडल्या जाणार आहेत. यासाठी शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी, अॅड सौ. निता सावंत - कविटकर, नारायण राणे, नितीन मांजरेकर, गणेशप्रसाद गवस यांनी मंत्री दीपक केसरकर यांचे आभार व्यक्त केले आहेत.