
देवगड : देवगड तालुक्यातील तळेबाजार येथे विजापूर येथील कामगार रानू पांगरू पांढरे(48) सध्या रा.तळेबाजार साईनगर याचा माती टाकत असताना चक्कर येऊन दुर्देवी मृत्यू झाला आहे. ही घटना 2 एप्रिल रोजी सायंकाळी 5 वा.सुमारास तळेबाजार साईनगर येथील गोविंद लाड यांच्या कंपाऊंडमध्ये घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या अधिक माहितीच्या आधारे, मयत रानू पांगरू पांढरे हा त्याचा मुलगा गणेश याच्यासमवेत तळेबाजार साईनगर येथे गोविंद लाड यांच्या कंपाऊंडमध्ये माती टाकण्याचे काम करीत होते. गुरूवारी सायंकाळी 5 वा.सुमारास माती टाकत असतानाच ते चक्कर येवून पडले. त्यांना तात्काळ उपचारासाठी ग्रामीण रूग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासल्यानंतर ते मयत झाल्याचे जाहीर केले. याबाबत देवगड पोलिस स्थानकात गणेश रानू पांढरे यांनी फिर्याद दिली आहे.
या घटनेबाबत पो.हे.कॉ.महेंद्र महाडिक यांच्या कडून अधिक तपास सुरू असून देवगड पोलिस ठाण्यात याबाबत आकस्मिक मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे.











