गटारांनी घेतला मोकळा श्वास

सामाजिक कार्यकर्ते वैभव मालंडकर यांचा पुढाकार
Edited by: उमेश बुचडे
Published on: April 08, 2026 12:13 PM
views 194  views

कणकवली : सामाजिक कार्यकर्ते वैभव मालंडकर यांच्या पुढाकाराने कणकवली शहरातील कांबळे गल्ली ते गणपती साना या मार्गावरील दोन्ही बाजूंच्या गटारांची स्वच्छता करण्यात आली. या उपक्रमामुळे परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून, जेसीपी आणि ट्रॅक्टरच्या मदतीने गटारांमधील साचलेला कचरा व सांडपाणी हटवण्यात आले आहे.

बराच काळ दुर्लक्षित राहिलेल्या या गटारांमुळे दुर्गंधी पसरत होती तसेच डासांचे प्रमाण वाढून आरोग्याच्या समस्या निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात होती. मात्र, या स्वच्छता मोहिमेमुळे गटारांनी अक्षरशः “मोकळा श्वास” घेतला असून परिसर स्वच्छ आणि आरोग्यदायी झाला आहे, अशा प्रकारचे उपक्रम नियमितपणे राबविण्याची गरज नागरिकांनी व्यक्त केली आहे. .