
दोडामार्ग : संपूर्ण दोडामार्ग शहरवासीयांचे आराध्य दैवत श्री देव पिंपळेश्वर देवस्थानचा १९ वा वर्धापन दिन उद्या 9 एप्रिल रोजी आयोजित करण्यात आला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदा देखील अनेक धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे भरगच्च आयोजन करण्यात आले आहे.
सकाळी ९ वाजता श्री सत्यनारायण महापूजा चे आयोजन करण्यात आले आहे तर १० वाजता आरती व तीर्थप्रसाद सुरु होईल. दुपारी १२.३० वाजता महाप्रसाद सुरू होईल. सायंकाळी ५ वाजता शहरातील सावंतवाडा येथील श्री दत्त राष्ट्रोळी भजन मंडळ यांच्या सुश्राव्य भजनाचा कार्यक्रम संपन्न होईल. तर रात्री १० वाजता " ओ काका .. आनी..आनी नाका " हे गोव्यातील एक कोकणी नाटक संपन्न होईल. दरवर्षीप्रमाणे आयोजित झालेल्या या वर्धापनदिन कार्यक्रमाला सहकुटुंब सहपरिवार उपस्थित राहण्याचे आवाहन पिंपळेश्वर देवस्थान समिती बाजारपेठ दोडामार्ग यांनी केले आहे.











