मनोज रावराणेंची शब्दपूर्ती | लोरे गव्हाळी ओहोळ स्वखर्चाने केला गाळमुक्त

Edited by:
Published on: June 25, 2023 15:24 PM
views 99  views

कणकवली : लोरे नं 1 गावातील नरामवाडी गव्हाळी ओहोळ येथे पावसाळ्यात दरवर्षी पूरस्थिती निर्माण होते.त्याचा फटका नरामवाडी येथील बहुतांश कुटुंबियांना बसतो. नरामवाडी मधील सुमारे 23 ते 30 घरे पावसाळ्यात पुरबाधित होतात. भातशेतीचेही नुकसान होत असते. कणकवली पं स चे माजी सभापती तथा लोरे पंचायत समिती चे माजी पं स सदस्य मनोज रावराणे यांनी पाऊस सुरू होण्याआधीच नरामवाडी गव्हाळी ओहोळ पात्रातील गाळ काढून घेतला.

कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष तुळशीदास रावराणे यांच्या सुचनेनुसार लोरे नं 1 गावचे सरपंच अजय रावराणे आणि स्थानिक ग्रामस्थांच्या देखरेखीखाली मनोज रावराणे यांनी  स्वखर्चाने तीन दिवस पोकलॅन्ड मशीन लावून गव्हाळी ओहोळ पात्रातील सगळा गाळ बाहेर काढला. त्यामुळे ओहोळ पात्र खोल झाले. ओहोळातील गाळ काढल्यामुळे ओहोळालगत नरामवाडी येथील सुमारे 25 ते 30 घरांना पुरापासून होणारा धोका टळला आहे.  यापुर्वी लोरे नरामवाडी तील ग्रामस्थांना दरवर्षी अतिवृष्टी झाल्यावर पुरस्थितीचा त्रास सहन करावा लागत होता. स्थानिक नागरिकांनी आपली कैफियत कृषी उत्पन्न बाजार समिती अध्यक्ष तुळशीदास रावराणे आणि माजी सभापती मनोज रावराणे यांच्याकडे मांडली होती.

तुळशीदास रावराणे यांनी याची दखल घेत मनोज यांना ग्रामस्थांची अडचण दूर करण्याची सूचना केली होती.त्यानुसार मनोज रावराणे यांनी नरामवाडी तील ग्रामस्थांना येत्या पावसाळ्याआधी ओहोळ गाळमुक्त करण्याचा शब्द दिला होता. त्यानुसार दोन दिवस स्वखर्चाने पोकलँड मशीन ने गव्हाळी ओहोळातील सर्व गाळ बाहेर काढून ओहोळ गाळमुक्त केला. त्यामुळे अतिवृष्टीत नरामवाडी तील ग्रामस्थांना पुराचा त्रासापासून दिलासा मिळणार आहे. माजी सभापती मनोज रावराणेंनी शब्दपूर्ती केल्याबद्दल लोरे नरामवाडी तील ग्रामस्थ समाधान व्यक्त करत आहेत.