बागकर मार्ग सार्वजनिक करण्यासाठी महिलांचे आंदोलन ! ; प्रजासत्ताकदिनी सावंतवाडी नगरपरिषदेसमोर उपोषण !

Edited by: प्रा. रुपेश पाटील
Published on: January 24, 2023 19:22 PM
views 249  views

सावंतवाडी : येथील शिवउद्यानाच्या मागून सालईवाडा येथे जाणारा बागकर मार्ग सार्वजनिक म्हणून घोषित करण्यात यावा, या मागणीसाठी तेथील रहिवाशांनी २६ जानेवारीला नगरपरिषद कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. याचे नेतृत्व महिला करणार आहेत. याबाबतचे निवेदन भूमी पटेकर यांच्यासह ९० महिलांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहे

त्यांनी दिलेल्या माहितीनुसार येथील नगरपरिषदेच्या जनरल जगन्नाथराव भोसले गार्डनच्या मागे असलेल्या भागात सुमारे पन्नासहून अधिक घरे आणि फ्लॅट धारक राहत आहेत. त्या ठिकाणी तब्बल १९८२ पासून घरे आहेत. घरे बांधताना त्या ठिकाणी रस्ता दाखविण्यात आला होता. परंंतू त्यानंतर ती जागा असल्याचे सांगून त्यावर अद्याप पर्यत डांबरीकरण अथवा डागडुजी झालेली नाही. दरम्यान हा रस्ता सार्वजनिक करण्यात यावा, तसेच त्या ठिकाणी डांबरीकरण करण्यात यावे ,अशी मागणी गेली अनेक वर्षे संबधित परिसरातील रहिवाशी करीत आहेत. मात्र याकडे पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. त्यामुळे अखेर आपल्याला न्याय मिळावा, यासाठी परिसरात राहणार्‍या महिलांनी आम्ही २६ जानेवारीला उपोषण करू, असा इशारा दिला.