सिंधुदुर्गातील मानाची भव्य दिव्य महिलांची नारळ लढवणे स्पर्धा

सोन्या - चांदीचा नारळ, कॉइन, नथ यासह विजेत्यांवर बक्षिसांचा वर्षाव
Edited by: कृष्णा ढोलम
Published on: August 05, 2025 13:46 PM
views 127  views

सौ. शिल्पा यतीन खोत मित्रमंडळाचं आयोजन 

मालवण : कोकणातील सर्वात मोठी तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मानाची स्पर्धा म्हणून नावलौकिक प्राप्त भव्यदिव्य स्वरूपात आयोजित होणारी महिला सहभागतील नारळ लढवणे स्पर्धा सौ. शिल्पा यतीन खोत मित्रमंडळ यांच्या वतीने नारळी पौर्णिमेचे औचित्य साधून मालवण बंदर जेटी येथे गेली 10 वर्षे आयोजित केली जात आहे. सर्वाधिक बक्षीस रक्कमेची आणि हजारो स्पर्धक सहभागी असणारी ही रेकॉर्डब्रेक ठरली आहे. यावर्षी स्पर्धेचे हे अकरावे वर्ष असून भव्यदिव्य स्वरूपात ही स्पर्धा संपन्न होणार आहे. 8 ऑगस्ट सायं. ४ वाजता मालवण बंदर जेटी येथे या स्पर्धेचा थरार रंगणार आहे. 

स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकास स्पर्धेचे खास आकर्षण असलेला सोन्या चांदीने मढवलेला नारळ, सोन्याचा कॉइन, सोन्याची नथ इरकल पैठणी यांसोबत विजेता चषक  तसेच उपविजेत्या स्पर्धकास सोन्याची नथ, पैठणी यांसह चषक यासोबत तृतीय क्रमांक व दोन उत्तेजनार्थ स्पर्धकांना विशेष पारितोषिक, गृहपायोगी भेटवस्तू असा बक्षीसांचा वर्षाव होणार आहे.

या सोबत उपस्थित प्रेक्षकांसाठी लकी ड्रॉ असून त्यात विशेष पारितोषिक असणार आहे. म्हणजेच स्पर्धा पाहणाऱ्या प्रेक्षकांनाही बक्षीस जिंकण्याची संधी असणार आहे. तर स्पर्धेत नाव नोंदणी करणाऱ्या पहिल्या 300 स्पर्धकांना आकर्षक भेटवस्तू असून उर्वरित स्पर्धकांना ही बक्षीस जिंकण्याची संधी असणार आहे. अशी माहिती स्पर्धेच्या सर्वेसर्वा सौ. शिल्पा यतीन खोत यांनी दिली आहे.

स्पर्धेत खास आकर्षण स्वरूपात झी मराठी गांव गाता गजाली फेम आर्टिस्ट यांचे 10 फुटी महाबली हनुमान असणार आहेत.

जिल्ह्याच्या कला रत्नापैकी एक असलेले मालवणी निवेदक बादल चौधरी आणि अक्षय सातार्डेकर स्पर्धेचे निवेदन करणार आहेत.

गेल्या काही वर्षात जिल्ह्यात सर्वत्र महिला सहभागतील नारळ लढवणे स्पर्धा मोठ्या प्रमाणात आयोजित होत आहेत. मात्र 10 वर्षांपूर्वी सौ. शिल्पा यतीन खोत यांनी महिला भगिनींना या खेळातही स्पर्धात्मक व्यासपीठ मिळावे या हेतूने या स्पर्धेचे सर्वप्रथम आयोजन केले. विजेता उपविजेता यांवर सोन्या चांदीच्या बक्षिसांचा वर्षाव ठरणारी ही स्पर्धा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मानाची स्पर्धा म्हणून ओळखली गेली. स्पर्धा लक्षवेधी ठरली. मात्र शिल्पा खोत सांगतात मी निमित्तमात्र आहे. स्पर्धेचे श्रेय मालवण वासियांचे आहे. आमच्या सर्व सहकाऱ्यांचे आहे. या सर्वांनी ही स्पर्धा मोठी केली करतं आहेत. त्यामुळे ही स्पर्धा माझ्या मालवण वासियांची आहे, सिंधुदुर्ग वासियांची आहे. असे शिल्पा खोत यांनी सांगितले.


स्पर्धेच्या अधिक माहिती व नाव नोंदणीसाठी*

▪️शिल्पा खोत मोबा : 9422584641

▪️तन्वी भगत : 8104500843

▪️सायली कांबळी 

9137303370

▪️निकिता तोडणकर 

7588472876 यांच्याशी संपर्क साधवा. असे आवाहन शिल्पा यतीन खोत मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.