
सावंतवाडी : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सिंधुदुर्ग जिल्हा भारतीय बौद्ध महासभेच्यावतीने येथील कळसुलकर हायस्कूलमध्ये महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा महिला अध्यक्षा प्रा सुषमा हरकुळकर ह्या असून यावेळी प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या डॉक्टर विजयालक्ष्मी चिंडक या प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत.
यावेळी महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे. सकाळी 10:30 ते सायंकाळी चार तीस यावेत हा मेळावा होणार असून यावेळी बौद्ध महासभेचे जिल्हा अध्यक्ष आनंद कासारडेकर, सचिव संजय पेंडेुरकर, कोषाध्यक्ष शिवप्रसाद चौकीकर, सावंतवाडी अध्यक्ष विजय नेमळेकर, सरचिटणीस चंद्रशेखर जाधव, कोषाध्यक्ष सुनील जाधव इत्यादी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यावेळी जिल्ह्यातील महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन सावंतवाडी तालुका अध्यक्ष मीनाक्षी तेंडुलकर, जिल्हा सरचिटणीस अपूर्वा पवार, कणकवली अध्यक्ष आशा भोसले, मालवण अध्यक्ष स्नेहा काळशेकर, दोडामार्ग अध्यक्ष राजश्री आयनोडकर, जिल्हा उपाध्यक्ष समता सैनिक दिलीप तरंदळेकर, रवीना कांबळे, कोषाध्यक्ष कणकवली अध्यक्ष वैष्णवी कदम, कुडाळ अध्यक्ष अंकिता कदम, जिल्हा उपाध्यक्ष समता सैनिक दल प्रीतम जाधव यांनी आवाहन केले आहे.