
वेंगुर्ला : ग्रामपंचायत वायंगणी वेंगुर्ले आणि के सुनंदा सदानंद कामत हिच्या स्मरणार्थ श्री.ज्ञानेश्वर सदानंद कामत आणि परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य चिकित्सा शिबीराचे आयोजन करण्यात आलाय. यात स्त्री रोग , बालरोग , त्वचा रोग, गुप्तरोग, हृदय रोग, मधुमेह तपासणी होणार आहे. रविवार दिनांक ९ मार्च २०२५ रोजी सकाळी 0९.०० वा. ते दुपारी 0४.०० वाजेपर्यंत हे शिबीर होणार आहे. वायंगणी गावातील ग्रामस्थांनी याचा लाभ घेण्याच आवाहन करण्यात आलंय.
अजेय शिंदे एम. डी. (बालरोग तज्ज्ञ डि.सी.एच.डि. व्ही.डि. (त्वचा रोग व गुप्त रोग तज्ज्ञ)मुंबई, डॉ. माया शिंदे एम.डी. (स्त्री रोग तज्ज्ञ) मुंबई, डॉ. हर्षदा डिंगणकर एम.डी. हृदय रोग तज्ज्ञ (मधुमेह तपासणी ) जनरल फिजिशियन पुणे, शार्दुल डिंगणकर, हृदय रोग शैल्य विकारक, श्री पुष्कर डिंगणकर फार्मासिस्ट पुणे हे डॉक्टर उपस्थित असणार आहे.
महिला दिन विशेष ग्रामपंचायत वायंगणी वेंगुर्ले आयोजित खास वायंगणी महिलांसाठी सोमवार दि. १० मार्च २०२५ रोजी दुपारी ठिक 0३.00 पाककला स्पर्धा विषय तृणधान्य वापरून पदार्थ बनविणे, प्रथम क्रमांक मिक्सर,व्दितीय क्रमांक कुकर तृतीय क्रमांक नॉनस्टिक कढई, सोमवार दि. १0 मार्च २०२५ रोजी सायंकाळी ठिक ५ वाजता महिलांसाठी फनी गेम प्रथम क्रमांक आकर्षक भेटवस्तू, मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार समारंभ, बक्षीस वितरण, 7 वा. सामुहिक नुत्य सादरीकरण,सोमवार दि. १० मार्च २०२५ रोजी सायंकाळी ठिक 0७.३० वाजता महिलांचे खास आकर्षण कार्यक्रम होम मिनिस्टर प्रथम क्रमांक पैठणी, व्दितीय क्रमांक सोन्याची नथ, तृतीय क्रमांक साडी