राष्ट्रवादी काँग्रेस महिला गटातर्फे महिला दिन साजरा

Edited by:
Published on: March 08, 2024 11:47 AM
views 235  views

सावंतवाडी : जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आज राष्ट्रवादी काँग्रेस महिला गटातर्फे सावंतवाडी येथील अंकुर महिला वसतिगृहात महिला दिन साजरा करण्यात आला. तसेच सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सावंतवाडी महिला तालुकाध्यक्षा  रिद्धी परब, शहाराध्यक्षा रंजना निर्मळ, अंकुर महिला वसतिगृहाचे अधीक्षक श्रीमती एल. बी. जंभोरे, श्रीमती अर्पिता वाटवे, समुपदेशक सावंतवाडी, संगीता माळी जिल्हा महिला बाल विभाग सिंधुदुर्ग,  संजय पवार , रोहन सैंदाने अभय केंद्र सावंतवाडी, तसेच अंकुर महिला सावंतवाडी येथील सर्व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.