महिलांनी उद्योग व्यवसाय करून समृद्धी साधावी : संदेश सावंत

Edited by: उमेश बुचडे
Published on: August 19, 2023 12:42 PM
views 212  views

कणकवली : केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या वतीने विविध योजनांचा फायदा महिलांनी करुन घ्यावा. उद्योग व्यवसायासाठी आवश्यक अर्थ पुरवठा बँकामार्फत करण्यासाठी मदत केली जाईल. महिलांनी मागे न राहता उद्योग व्यवसाय करावेत,असे आवाहन माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत यांनी केले.

तसेच लवकरच कनेडी येथे डेअरी सुरू करण्यात येणार असल्याचे सांगितले. युवा संदेश प्रतिष्ठान नाटळ - सांगवे यांच्यावतीने आयोजित मोफत मेहंदी, अंब्रोडरी व ग्लास पेंटींग प्रशिक्षणाचा समारोप कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत, अशोक कांबळे, प्रफुल्ल काणेकर,संजय सावंत, राजू देसाई, राजश्री पवार, मयुरी मुंज, राजू सापळे, नितिन गावकर, मीनल पवार,प्रियाली कोदे आदी मान्यवर उपस्थित होते.

सोमवार दिनांक ७ ऑगस्ट २०२३ ते शुक्रवार दिनांक १८ ऑगस्ट २०२३ या कालावधीत चाललेल्या या प्रशिक्षण वर्गात विवीध प्रकारची मेहंदी, अंब्रोडरी व ग्लास पेंटींग यांचे देण्यात आले.या प्रशिक्षण वर्गात १२६ महिला सहभागी झाल्या, सर्व सहभागी महिलांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले . मार्गदर्शक प्रियाली सुरेंद्र कोदे यांचा शाल ,श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

सर्व महिला उत्साहाने व आनंदाने सहभागी झाल्या. उपस्थित महीलांमधून नम्रता काणेकर, सृष्ठी शिरसाट व श्रद्धा चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले. मनोगतात उपक्रमाबाबत समाधान व्यक्त करताना आयोजक संदेश सावंत आणि संजना सावंत यांचे आभार मानले.