
सावंतवाडी : उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडी येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडी येथे कार्यरत असलेल्या सर्व महिला अधिकारी व कर्मचारी यांचा सत्कार वैद्यकीय अधीक्षक डॉ गिरीशकुमार चौगुले यांनी केला.
महिला अधिकारी व कर्मचारी यांनी वेळेत उपस्थित राहून रुग्णासेवा करत असल्यामुळे रुग्णालयाचा कामकाज उत्कृष्ट पद्धतीने चालू आहे. महिलांचा आदर व सन्मान जिथे होतो तिथे प्रगती निश्चित होते. अगोदर चूल आणि मूल यालाच निगडित असलेल्या महिला आता शिक्षण घेऊन पुरुषांचा सामानतेने काम करत आहेत. त्यांची सहनशक्ती चांगली असते. कोणत्याही वैफाल्यानंतर महिला व्यसनाधीन होत नाहीत. ते सक्षम, सशक्त असतात असे मत वैद्यकीय अधीक्षक डॉ. गिरीशकुमार चौगुले यांनी व्यक्त केले. यावेळी डॉ पांडुरंग वजराठकर,डॉ राजेश नावंगुळ, डॉ क्षमा देशपांडे,डॉ सागर जाधव व रुग्णालयाचे सर्व अधिकारी व कर्मचारी वृंद उपस्थित होते.