
मंडणगड : येथील मंडणगड तालुका विकास मंडळ संचलित, लालबहादूर शास्त्री हायस्कूल दहागावमध्ये जागतिक महिला दिनानिमित्ताने शाळेतील महिला शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. विजय खाडे यांच्या कुशल नेतृत्वाखाली त्यांनी, शालेय इतिहासात प्रथमच महिला दिनानिमित्ताने महिलांचा सन्मान करण्याचे नियोजन केले.
त्यानुसार प्रशालेतील शिक्षिका सौ. मानसी पालांडे, सौ.विनया नाटेकर, तसेच ग्रंथपाल श्रीमती वैशाली पुदाले यांचा शाल व गुलाबपुष्प देऊन ,माननीय मुख्याध्यापकांच्या हस्ते सत्कार करण्यात आला . त्यानंतर पाचवी ते नववी पर्यंतच्या प्रत्येक विद्यार्थिनी प्रतिनिधी कुमारी समृद्धी जाधव, समृद्धी तांबुटकर, श्रुती सोविलकर, स्मरणिका गायकवाड ,श्रावणी जाधव, सलोनी मालुसरे यांना शिक्षक श्री. विक्रम शेले , श्री.मनोज चव्हाण, श्री.किशोर कासारे ,श्री. जितेंद्र कलमकर यांच्या हस्ते गुलाब पुष्प देऊन अभिनंदन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशालेतील शिक्षक श्री. किशोर कासारे यांनी केले. तसेच यानिमित्त त्यांनी महिला दिनाचे महत्त्व विशद केले. आपल्या सत्काराला उत्तर देताना सौ.विनया नाटेकर यांनी हा नाविन्यपूर्ण उपक्रम असून, आमच्या सेवेमध्ये पहिल्यांदा घेण्यात आला. याबद्दल माननीय मुख्याध्यापक व शिक्षकांना त्यानी धन्यवाद दिले. यानंतर मुख्याध्यापकांनी मार्गदर्शन करताना," प्रत्येक यशस्वी पुरुषामागे स्त्रिचा हात असतो." असे सांगितले. तसेच स्त्रि ही कन्या, माता, ताई अशा विविध भूमिका बजावत असते. असे ते म्हणाले. आभार प्रदर्शनाने या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.