महिलेचा सर्पदंशाने मृत्यू

Edited by: दिपेश परब
Published on: May 21, 2025 19:45 PM
views 255  views

वेंगुर्ले : होडावडा कस्तुरबावाडी येथील प्रियतमा गोपाळ दाभोलकर (६३) या आपले राहते घराची बाथरूम मध्ये काल मंगळवारी सायंकाळी ६.३० वाचण्याच्या सुमारांस गेले असताना तेथे कोणत्यातरी सरपटणाऱ्या जनावराने त्यांच्या उजव्या हाताच्या मधल्या बोटाला चावा घेतला. तिच्या आरडाओडरीने तिला सरपटणारा प्राणी चावल्याचे समजताच तिला औषध उपचारांकरिता उपजिल्हा रुग्णालय वेंगुर्ले येथे दाखल केले असता रात्री ८ वाजता तेथील वैद्यकीय अधिकारी यांनी त्यांना तपासून मयत घोषित केले.

या प्रकरणी होडावडा देऊळवाडी येथील अरविंद गोपाळ नाईक यांनी वेंगुर्ले पोलीसांत खबर दिली. त्यानुसार प्रियतमा गोपाळ दाभोलकर हिच्या मृत्यूची अकस्मित मृत्यू म्हणून नोंद झाली आहे.

या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक संदिप भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली महिला हेड कॉन्स्टेबल रंजिता चौहान करीत आहेत.