दुसऱ्या मजल्यावरून पडून महिलेचा मृत्यू

Edited by: विनायक गांवस
Published on: May 26, 2024 14:46 PM
views 66  views

सावंतवाडी : इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून पडून अंजली वामन चव्हाण वय ५५ या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. सावंतवाडी जिमखाना मैदान जवळील कॉम्प्लेक्स येथे ही दुर्देवी घटना घडली. या घटनेमुळे परीसरात हळहळ व्यक्त होत आहे. 

या मृत महिलेचे १५ दिवसांपूर्वी डोळ्याचे ऑपरेशन झाले असल्याने तीला नीट दिसत नव्हते. सायंकाळच्या सुमारास कामानिमित्त बालकनीत गेली असता तोल जाऊन दुसऱ्या मजल्यावरून ती खाली कोसळली. १०८ रुग्णवाहिकेच्या सहाय्याने सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात तीला दाखल करण्यात आले असता तत्पूर्वीच तीचे निधन झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांना जाहीर केले.

१५ वर्षांपूर्वी तीचे लग्न झाले होते. त्यानंतर ती आपल्या भावांच्या घरी राहत होती. रेल्वेचे अधिकारी दिनेश चव्हाण आणि बांधकाम विभागाचे अधिकारी राजन चव्हाण यांची ती बहिण होत. तोल जाऊन पडल्यानं तीचा दुर्दैवी मृत्यू झाला. उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले असून पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.