राकेश नेवगी यांच्या सहकार्यातून जुम्मा मस्जिद शेजारील गडघ्याचे काम पूर्ण

कोकण विभाग महिला राष्ट्रवादी अध्यक्ष सौ. अर्चनाताई घारे परब यांनी पदाधिकाऱ्यांसमवेत केली पाहणी
Edited by: विनायक गांवस
Published on: April 21, 2023 11:35 AM
views 331  views

सावंतवाडी : सावंतवाडी वैश्यवाडा येथील जुम्मा मस्जिद शेजारील गडघ्याचे काम राष्ट्रवादीचे शहर चिटणीस राकेश नेवगी यांच्या सहकार्यातून पूर्ण करून देण्यात आले. त्याची कोकण विभाग महिला राष्ट्रवादी अध्यक्ष सौ. अर्चनाताई घारे परब यांनी सावंतवाडी तालुका राष्ट्रवादी व शहर राष्ट्रवादीच्या सर्व पदाधिकाऱ्यांसमवेत जुम्मा मसजिद येथे पाहणी केली. त्याप्रसंगी जुम्मा मस्जिद ट्रस्टच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी व मुस्लिम समाज बांधवांनी राष्ट्रवादी परिवाराचे व श्री राकेश नेवगी यांचे स्वागत केले व आभार मानले.

त्यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, शहराध्यक्ष देवेंद्र टेमकर, महिला शहराध्यक्ष सायली दुभाषी, जिल्हा कार्याध्यक्ष उद्योग व्यापार हिदायतुल्ला खान, रत्नागिरी जिल्हा महिला निरीक्षक दर्शना बाबर देसाई, उद्योग व्यापार तालुका उपाध्यक्ष याकुब शेख, जिल्हा उपाध्यक्ष अल्पसंख्यांक इफ्तेकार राजगुरू, तालुका चिटणीस काशिनाथ दुभाषी, जुम्मा मस्जिद ट्रस्टचे परवेज बेग, समीर बेग, कैस बेग, मोहसीन मुल्ला, शाहिद शेख, जिकर मेमन, निसार नदाफ अबू भडगावकर व इतर मुस्लिम समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.