राजन तेलींच्या प्रवेशाने पदाधिकारी कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य : संजय गवस

Edited by: लवू परब
Published on: October 21, 2024 14:01 PM
views 262  views

दोडामार्ग : शिवसेना उबाठा पक्षात राजन तेलींनी प्रवेश केल्या नंतर दोडामार्ग उबाठा शिवसेनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यां मध्ये नव चैतन्य निर्माण झालं आहे. सर्व पदाधिकारी कार्यकर्ते जोमाने कामाला लागले आहेत. महाविकास आघाडीचे उमेदवार राजन तेली यांचे तिकीट निश्चित झाले असून विजय महाविकास आघाडीचाच होणार आहे असे उबाठा तालुका प्रमुख संजय गवस यांनी यावेळी सांगितले आहे. येथील शिवसेना उबाठा कार्यालय येथे कोकणसाद लाईव्ह साठी खास बातचीत करताना ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की भाजप पक्षात प्रवेश करून राजन तेली यांनी मोठी चूक केली होती हे त्यांनी आता मान्य केले आहे. म्हणून ते स्वगृही परतले आहेत  त्यामुळे शिवसेना उबाठा पक्षात नव चैतन्य उमटल आहे. प्रत्येक शिवसैनिकच्या मनात जोमाने काम करणाची ऊर्जा  निर्माण झाली आहे. त्यामुळे महाविकास आघाडी चे उमेदवार राजन तेली यांचे तिकीट निश्चित झाले आहे.

तेलींचा जनससंपर्क मोठा 

दरम्यान, संजय गवस बोलताना म्हणाले राजन तेली हे मूळचे शिवसैनिक असून त्यांच्यात काम करण्याची धडाडी आहे. लोकांच्या समस्या कशाप्रकारे सोडवाव्यात हे त्यांना माहित आहे. त्यांचा लोकसंपर्क या सर्वांची बाजू पाहिली तर तेली त्या पद्धतीने काम करतील अशी जनतेची इच्छा आहे  शिवसेना ही 80% समाजकारण  व 20% राजकारण करत असते. कऱ्या अर्थाने प्रचाराला जेव्हा सुरुवात होईल काम करण्यासाठी उतरतील असे मत तालुका प्रमुख संजय गवस यांनी व्यक्त केले.

राजन तेली हे प्रगल्भ नेतृत्व आहे : नगरसेवक  चंदन गावकर 

दोडामार्ग  शहराचा राजन तेली यानां चागला अभ्यास आहे. दोडामार्ग शहर व राजन तेली यांचा अगदी जुना संबंध आहे. शहरातील स्थानिक समस्या असो, राजन तेली सारखा सामाजिक कार्यकर्ता लोकांच्या मनामनात आहे त्यामुळे दोडामार्ग शहर नक्कीच राजन तेलींच्या पाठीशी आहे असे नगरपंचायतचे नगरसेवक चंदन गावकर यांनी म्हटले आहे.

विकास काम ही प्रत्येक सरकारच्या माध्यमातून होतच असतात दीपक केसरकर यांनी पंधरा वर्षाच्या कालखंडात किती विकास कामे केली ती त्यांनी जनतेसमोर आणून दाखवावे. कॅबिनेट दर्जाचे पद असलेल्या दीपक केसरकर यांनी दोडामार्ग तालुक्यात एक तरी रोजगार आणायला पाहिजे होता अशा लोकांच्या अपेक्षा होत्या मात्र निवडणुकीच्या तोंडावर कामांची भूमिपूजन करून जनतेला फसवण्याचे काम फक्त केसरकर यांनी केला आहे. आडाळी एमआयडीसी, तिलारी एक्झ्युमेंट  पार्क, अंबड गाव माटणे या परिसरातील गावांना तिलारीचे पाणी यासारख्या अनेक जनतेच्या समस्या त्यांनी सोडविल्या नाहीत त्यामुळे जनता त्यांच्या आश्वासनांना बळी पडणार नाही येणाऱ्या निवडणुकीत त्यांची जागा त्यांना नक्कीच दाखवणार असे गवस म्हणाले.

उबाठा शिवसेनेत राजन तेली यांनी प्रवेश केल्यानंतर दोडामार्ग तालुक्यातील युवा वर्गात एक वेगळीच उत्सुकता निर्माण झाली आहे. येथील युवा वर्गाला मंत्री दीपक केसरकर यांनी अडाणी सारख्या एमआयडीसीमध्ये आणि उद्योगधंदे आणतो 500 हून अधिक युवक युवती यांना याठिकाणी रोजगार मिळणार आहे. या त्यांच्या खोट्या अमिषाला कंटाळले आहेत. आजच्या युवकाला राजन तेली यासारख्या धडपडणाऱ्या कार्यकर्त्यांकडून अपेक्षा आहे. दीपक केसरकरांची कामे राज तेली नक्कीच करतील असे युवा तालुका प्रमुख मदन राणे यांनी म्हटले आहे.