रमजान ईदच्या विशाल परब यांनी दिल्या शुभेच्छा

Edited by: भरत केसरकर
Published on: April 11, 2024 09:34 AM
views 195  views

बांदा : बांदा येथील आपले मित्र तसेच माजी सरपंच अक्रम खान यांच्या घरी सदिच्छा भेट देत आज भाजपचे युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी रमजान ईद निमित्त त्यांना शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी चराठा उपसरपंच अमित परब, केतन आजगावकर, तेजस माने, ओमकार पावसकर, श्रेयस परब आदी मान्यवर उपस्थित होते.