वेंगुर्लेची सुकन्या किरण मेस्त्री 'चार्मिंग मिस इंडिया २०२५' किताबची मानकरी

Edited by: दिपेश परब
Published on: June 01, 2025 17:19 PM
views 266  views

वेंगुर्ले : गुर्मीत गरहा ग्रूमिंग स्कूल, नवी मुंबई यांच्या वतीने जुईनगर येथे आयोजित करण्यात आलेल्या मिस, मिसेस आणि मिस्टर इंडिया स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले गावची सुकन्या किरण मेस्त्री हिने "चार्मिंग मिस इंडिया २०२५" हा किताब पटकावला आहे. मिस इंडिया स्पर्धेसाठी एकूण ८ स्पर्धक सहभागी झाले होते. त्यामधून आपल्या वैशिष्ट्यपूर्ण गुणांच्या जोरावर किरण मेस्त्रीने हा बहुमान मिळवला. या स्पर्धेचे परीक्षण परीक्षक अमर सोनवणे, सुंदर अलेक्झेंडर, सूरज कुमार, स्वीकृती श्रीवास्तव, फरहान रमझान यांनी केले. तिच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून तिचे अभिनंदन आणि कौतुक होत आहे.