
सावंतवाडी : गेली ९ वर्ष भुमिपूजन होऊन देखील सावंतवाडी टर्मिनसचं काम पुर्णत्वास आलेलं नाही. सावंतवाडी टर्मिनसच्या भुमिपूजनाचा कार्यक्रम तुम्हाला डावलून केला होता. अद्यापही टर्मिनसच काम पुर्णत्वास आलेलं नाही असं केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना विचारल असता ते म्हणाले, मला डावलल्यामुळे हे काम रखडलेलं नाही. मी माहिती घेऊन सावंतवाडी रेल्वे टर्मिनस सुरु होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करतो. मी विकासकामाच्यामध्ये कधीही येत नाही. दुश्मनाचही मी अभिनंदन करीन, खांद्यावर हात मी कधीही कुणाच्या ठेऊ शकतो असं विधान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केल. पडवे येथील आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
2014 च्या निवडणुकीपूर्वी केसरकर आणि राणे यांच्यात टर्मिनस मडुरा की सावंतवाडीत? व्हावं यावरून मतभेद झाले होते. या वादाच रूपांतर संघर्षात झालं होतं. 2014 ला देशात आणि राज्यात भाजपा - शिवसेनेची सत्ता असताना नारायण राणेंना बाजूला ठेऊन सावंतवाडी टर्मिनसच भूमिपूजन करण्यात आल होत. तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या सोहळ्यास उपस्थित होते. परंतु, नऊ वर्षे होऊन देखील सावंतवाडी टर्मिनसचे काम पूर्णत्वास आलेल नाही. यामुळे पुन्हा एकदा सावंतवाडी रेल्वे टर्मिनस कृती समिती व प्रवासी संघटनेची स्थापना करण्यात आली असून हा मुद्दा तापला आहे. याबद्दल केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना विचारल असता, मला डावलल्यामुळे हे काम रखडलेलं नाही. मी माहिती घेऊन सावंतवाडी रेल्वे टर्मिनस सुरु होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करतो. मी विकासकामाच्यामध्ये कधीही येत नाही. माझ्या दुश्मनानं जरी विकासकाम चालू केलं तरी मी त्याचं अभिनंदन करीन. खांद्यावर हात मी कधीही कुणाच्या ठेऊ शकतो आज तुम्ही ते पाहिलंत अशी मिश्किल टिप्पणीही राणेंनी केली.