समाज संघटीत करण्यासाठी प्रयत्न करणार : मारुती मोहिते

Edited by: उमेश बुचडे
Published on: January 27, 2024 05:03 AM
views 48  views

कणकवली : बेलदार भटका समाज संघ महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने सिंधुदुर्ग जिल्हा बेलदार भरका समान संघाची जिल्हा कार्यकरणी निवड करण्यासाठी आप बुधवार दि. 24/01/2024 रोजी श्री तुकाराम दादा जाधव मु.पो. सांगवे, कनेडी ला. कणकवली, जि. सिंधुदुर्ग याच्या घरी जिल्हयातील बेलदार समाज बांधवाची सभा झाली. बेलदार भटका समाज संघ महाराष्ट्र राज्याचे कार्याध्यक्ष मा. श्री संजय सखाराम चव्हाण, मा. श्री. किरण रघुनाथ चव्हाण कोकण विभागीय अध्यक्ष यांच्या उपस्थितीत बेलदार समाजाची जिल्हा कार्यकारणी निवडण्यात आली.

बेलदार भटका समाज हा सिंधुदुर्गच्या कानाकोपऱ्यात ठिकठिकाणी वसलेला आहे. या समाजातील प्रश्न सोडविण्याच्यादृष्टीने समाज बांधवांना संघटीत करण्याचा निर्णय घेण्यात आला. समाज उन्नतीसाठी हा समाज एकवटला जावा ही काळाची गरज आहे.  बेलदार समाज एकत्रित करण्यासाठी सर्व स्तरातुन पदाधिकारी प्रयत्नशील आहेत. यावेळी बेलदार भटका समाजातील महिलांना सक्षम व संघटीत करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मारुती मोहिते यांनी सांगितले.

कार्याध्यक्ष श्री. संजय चव्हाण यांनी समाजाला मार्गदर्शन करताना असे सांगितले की, समाजातील सर्व समान बांधवाना जातीचे दाखले काढण्यासाठी तसेच जात वैधता प्रमाणपत्र काढण्यासाठी अडचणी येतात याबाबत शासन दरबारी योग्यते मार्गदर्शन मिळविण्यासाठी प्रयत्न केला जाईल. तसेच शासनाच्या विविध योजना याबाबतपण समाजात जाणीव व जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाईल. आपण नेहमीच समाजाच्या बाजूने विविध मागण्यासाठी शासन दरबारी आवज उठवणार अशी सर्व समाज बांधवाना ग्वाही दिली.

 बेलदार भटका समाज संघ महाराष्ट्र राज्य अध्यक्ष रमेश भाऊ जाधव यांच्या मार्गदर्शनात, राज्याचे कार्याध्यक्ष मा. श्री. संजय भाई चव्हाण यांच्या उपस्थित सिंधुदुर्ग जिल्ह्याची झाले ली निवड पुढील प्रमाणे 1)मारुती नामदेव मोहिते - जिल्हाध्यक्ष - वैभववाडी २) तुकाराम दादा जाधव- उपाध्यक्ष सांगवे, कनेडी, 3)गणेश दादा जाधव - उपाध्यक्ष सावंतवाडी, 4)अशोक आणा मोहिते कार्याध्यक्ष - मालवण,७)महादेव पुंडलिक पवार सचिव - सांगवे, कनेडी, 6) संतोष बामन चव्हाण उपसचिव,7) सागर रमेश जाधव- खजिनदार - सांगवे कनेडी,8)वसंत फकीरा जाधव- सल्लागार - सावंतवाडी, 9) प्रकाश रामचंद्र पवार - सल्लागार - वैभववाडी, 10) दादाराम राजाराम चव्हाण - सल्लागार, 11) शिवाजी रघुनाथ पवार - सल्लागार - सांगवे, कनेडी,12)  दिलीप रामचंद्र पवार- संचालक सदस्य - कणकवली, 13) दिलीप आप्पा चव्हाण - संचालक सदस्य- सांगवे, कनेडी,14) सौ. पुजा दिनेश जाधव - कायदेशिर सल्लागार , 15) सौ.निता जनार्दन जाधव - महिला प्रतिनिधी- सांगवे कनेडी, 16) सौ. पुष्या शिवाजी पवार - महिला प्रतिनिधी सांगवे, कनेडी वरील प्रमाणे जिल्हा कार्यकारणी निवडण्यात आली. सर्व कार्यकारणी सदस्यानी समाजाच्या उन्नतीसाठी काम करण्याचे ठरविले. 

नुतन जिल्हाध्यक्ष मा. श्री. मारुती नामदेव मोहिते बांनी प्रथम सर्व समाज बांधवाचे आभार मानले. जमाजासाठी मी सदैव कामासाठी उपलब्ध राहीन अशी ग्वाही दिली तसेच समाजाच्या असणाऱ्या विविध समस्या या कार्याध्यक्ष व कोकण विभागीय अध्यक्ष यांच्या माध्यमातून सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहीन असे सांगितले. कोकण विभागीय अध्यक्षपदावर निवड झाल्याबदल सा. श्री किरण चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला. तसेच नूतन जिल्हाध्यक्ष म्हणून निवड झाल्याबदल मा.श्री. मारुती मोहिते यांचापण सत्कार करण्यात आला, सदरच्या कार्यक्रमासाठी संतोष शंकर पवार माजी नगरसेवक  वैभववाडी व जिल्हाभरातून समाज बांधव उपस्थित होते. 

सदरच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन समाजाला नेहमीच मार्गदर्शन करणारे वसंत जाधव यांनी केले तर कार्यक्रमात सर्व समाजबांधव उपस्थित राहिले याबाबत सर्वांचे आभार किरण चव्हाण यांनी मानले.